logo

भारतीय बौद्ध महासभेची साक्री तालुका kk कार्यकारणी निवड संपन्न

🔸🔹🔸🔹🔸🔹भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय रविंद्रजी गुरचळ यांच्या सूचनेनुसार धुळे जिल््यातील साक्री तालुका कार्यकारणीची बांधणी निमित्ताने दिनांक 2 -11- 2025 रोजी साक्री येथे सिद्धांत समाज कार्य महाविद्यालय साखरे येथे भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक विभाग प्रभारी अण्णासाहेब देविदास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीसाठी धुळे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान सुनंद भामरे व भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हा मुख्य संघटक आयुष्यमान मधुकर जी निकुंभे यांच्या उपस्थितीत साखरी तालुका भारतीय बौद्ध महासभेची बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये खालील प्रमाणे साक्री तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
साकरी तालुका अध्यक्ष आयुष्यमान जयवंत शिंदे उपाध्यक्ष मिलिंद बच्छाव, सचिव प्रा. प्रवीण सोनवणे, सहसचिव अरविंद ब्राह्मणे, कोषाध्यक्ष प्रा.कैलास वाघ सर ,कार्याध्यक्ष नाना वाघ, विहार समन्वयक दिलीप सूर्यवंशी , .सह कोषाध्यक्ष अनिल मगर ,मुख्य संघटक राजेंद्र चिंधा जाधव , संघटक प्रकाश भिला भामरे ,सह संघटक भगवान जीवन बोरसे, सह कार्याध्यक्ष राजेंद्र जी. वाघ. अशा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून सदर पदाधिकारी यांना भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान सुनंद भामरे व धुळे जिल्हा मुख्य संघटक आयुष्यमान मधुकरजी निकुंभे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व मंगल कामना देण्यात आले आहेत.

57
2956 views