logo

डहाणू, चिखला येथे चरस या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण १२,५७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.…!!!

दि.०६/११/२०२५ रोजी रात्रौ ००.०५ वाजताचे दरम्यान तलासरी पोलीसांना गोपणीय माहिती मिळाली की, घोलवड पोलीस ठाणे हद्दितील चिखला बिच येथे एक इसम हा चरस या अंमली पदार्थांची विक्री करण्याकरीत येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे घोलवड पोलीस ठाणे यांचे मदतीने नमूद ठिकाणी कारवाईसाठी सापळा रचला असता दि.०६/११/२०२५ रोजी पहाटे ०४.०० वाजताचे सुमारास एका काळ्या रंगाच्या सीबी शाईन MH48-AD-2456 यावरून एक इसम संशयीतरित्या येवून थांबला असल्याचे दिसून आले. सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव सायमन जेत्या वळवी, वय ४० वर्षे, रा. कैनाड कडुपाडा, ता. डहाणु, जि. पालघर असे सांगितले. सदर इसमाच्या ताब्यातील मोटारसायकलची झडती घेतली असता मोटारसायकलच्या हँडलला एक प्लास्टिक पिशवी मिळून आली. ती चेक केली असता त्यामध्ये एकूण १२,००,०००/- रूपये किमतीचा ६०० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ मिळून आला. सदर आरोपीकडून मोबाईल व गाडीसह एकूण १२,५७,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीविरूध्द घोलवड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १४४/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब), (1) प्रमाणे दि. ०६/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा सपोनि/साहेबराव कचरे, नेमणूक घोलवड पोलीस ठाणे हे करीत आहेत.

19
1812 views