नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS) पनवेल या संस्थेचे आठवे निसर्ग शिबिर यशस्वीरीत्या संपन्न.
नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS) पनवेल
या संस्थेने दिनांक २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मोरबे येथे आयोजित केलेल्या ८ वा. निसर्ग शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात पनवेल, उरण, कर्जत, कल्याण आणि सोलापूर या ठिकाणाहून एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या शिबिरामध्ये सर्पविज्ञान, मुंगीचे जीवनरहस्य, सस्तनप्राणी, नेचरट्रेल, पक्षीनिरीक्षण, निसर्गावर आधारित खेळ आणि त्याच बरोबर अग्निशामक, आर्चरी, चमत्कारामागील विज्ञान व जंगल कुकिंग, किल्ले बनविणे या सारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
या शिबिरात संतोष उदरे, निखिल भोपळे, निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवली श्री . दिलीप राहुलकर, श्री . आर्यन उदरे, ज्योती शिरसागर व पवन कोकाटे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर या शिबिरा मध्ये स्वयंसेवक म्हणून ममिता उदरे, अनिशा हातमोडे, दिपाली भोपळे आणि बाबू शेख यांनी मोलाची कामगिरी बजावली.
https://www.facebook.com/share/v/1LvDcsovoU/