logo

नीरा भीमा कारखान्याचा इथेनॉलचा पहिला टँकर रवाना, हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते पूजन.

नीरा भीमा कारखान्याचा इथेनॉलचा पहिला टँकर रवाना,
हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते पूजन.
इंदापूर : प्रतिनिधी

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामातील इथेनॉलचा पहिला टँकर ऑइल कंपन्यांच्या डेपोकडे मंगळवारी (दि. 4) रवाना करण्यात आला. याप्रसंगी पहिल्या टँकरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथे करण्यात आले.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चालू ऊस गळीत हंगामामध्ये इथेनॉल उत्पादनाचे सुमारे 1 कोटी 30 लाख लिटरचे उद्दिष्ट असल्याची माहिती याप्रसंगी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी दिली. तसेच कारखान्याच्या चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे सुरु झाला असून दररोज सुमारे 5500 मे. टन उसाचे गाळप केले जात आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. _______________________
फोटो:-शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा कारखान्याच्या इथेनॉलच्या पहिल्या टँकरचे पूजन प्रसंगी हर्षवर्धन पाटील, सौ.भाग्यश्री पाटील व इतर.

12
723 views
1 comment  
  • Ajit Nivrutti Chahane

    खालील शीर्षकावर आधारित सविस्तर बातमी तयार केली आहे. हवी असल्यास मी याची संक्षिप्त आवृत्ती, सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हिडिओ स्क्रिप्टही देऊ शकतो. --- जेजुरी निवडणुकीत ८० लाखांची घरपट्टी वसूल; नगरपरिषदेचा आर्थिक ताण कमी जेजुरी – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या विशेष वसुली मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून तब्बल ८० लाख रुपयांची घरपट्टी गोळा करण्यात आली आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून वाढत असलेला नगरपरिषदेचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेष वसुली पथकांची प्रभावी मोहीम नगरपरिषद प्रशासनाने मागील काही आठवड्यांपासून करदात्यांकडे थकबाकी वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त केली होती. घरगुती कर व्यापारी मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा या सर्व माध्यमांतून वसुलीला गती देण्यात आली. निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनाने वसुलीला सर्वोच्च प्राधान्य दिले. नागरिकांचा वाढता प्रतिसाद अनेक थकबाकीदारांनी दंडाची शक्यता, सेवा-सुविधांवर परिणाम व आगामी निवडणूक या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने कर भरला. व्यापारी वर्गाकडूनही विशेष प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आर्थिक स्थैर्याकडे पाऊल या ८० लाखांच्या महसुलामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीला मोठा हातभार मिळत आहे. सध्या नागरी सुविधा, पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापन या योजनांसाठी निधीअभावी अडथळे येत होते. नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या मते: > “या वसुलीमुळे दैनंदिन कामकाज सुकर होईल आणि प्रलंबित नागरी प्रकल्पांना गती देता येईल.” पुढील उद्दिष्ट – १ कोटींचा टप्पा नगरपरिषदेचे ध्येय अजून किमान २०–२५ लाखांची अतिरिक्त वसुली करून १ कोटींचा टप्पा गाठण्याचे आहे. त्यासाठी पुढील काही दिवस आक्रमक मोहीम सुरूच राहणार आहे. --- तुम्हाला हा लेख अधिक रिपोर्टिंग शैलीत, अधिक नाट्यमय, अधिक माहितीपूर्ण, किंवा लघुरूपात हवा असल्यास नक्की सांगा!