logo

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी अमित भाऊ डिवरे तर नांदुरा तालुका अध्यक्षपदी गणेश बानाईत यांची निवड.

दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी निंबा देवी संस्थान निंबोळा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना नांदुरा तालुका यांचे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी संघटना NGP 4511 च्या सर्वांना तालुका समितीने संयुक्त राजीनामा सादर करीत नव्याने उदयास आलेली महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 या संघटनेचा कार्यभार सांभाळावा असे सर्वानुमते ठरले. सदर बैठकीला जवळपास 85 कर्मचारी हजर होते. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 चे सरचिटणीस/संस्थापक यशवंत भाऊ इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नांदुरा तालुका अध्यक्षपदी गणेश बानाईत यांची निवड करण्यात आली तसेच पूर्वी असलेली कार्यकारणी कायम ठेवण्यात आली. बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी अमित भाऊ डीवरे यांची निवड करण्यात आली. राज्य कार्यकारणी मध्ये प्रमोद भाऊ काटे व सुनील भाऊ जुमडे यांची निवड झाली असून जिल्हा सदस्य पदी कैलास आढाव यांची नियुक्ती झाली. सदर बैठकीला शिवाभाऊ भगत ,गणेश पाटील साबे, शांताराम अ ढाव गोपाल जुमडे, निलेश दाभाडे ,गजानन घणोकार, सापुर्डा शिंगोटे, संतोष दांडगे ,परमेश्वर भगत, नितीन बहुरूपे, विश्वनाथ डीवरे प्रदीप तांदुळकर, भीमराव इंगळे, एकनाथ झाल्टे, सुनील रणीत, शिवशंकर गोसावी, विठ्ठल बोदवडे, ऋषिकेश तायडे, पांडुरंग घुले ,अजय चव्हाण, दीपक वाकोडे, कैलास अ ढाव, प्रफुल्ल चोपडे व इतर कर्मचारी हजर होते.

82
4232 views