logo

आरोग्य सेवक पदाकरिता तब्बल 15 लाख रॅकेटचा छडा बनावट नियुक्तीपत्र व नक्कली शिक्के

रोहन कळसकर ( मुख्य संपादक)

भंडारा:- आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पदाच्या रिक्त पदावर नोकरी लावून देण्याच्या नावावर अनेक बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेट अमरावती पोलिसांनी भंडारा येथे उघडकीस आणताच खडबड उडाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार भंडाऱ्यात आरोग्य सेवक पदाकरिता प्रति उमेदवाराकडून 15 लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पार्दफास केला आहे. याप्रकरणी दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे . भंडारा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात बनावट भरतीचा रॅकेटचा रॅकेट पार्दफास केला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणून नियुक्ती करण्याकरिता प्रति उमेदवाराकडून 15 लाख रुपये घेतल्या असल्याच्या संतापजनक प्रकार घडला आहे . या मने धक्कादायक म्हणजे तरुणांना बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या प्रकरणात अमरावती पोलिसांनी भंडारा येथुन दोन आरोपींना अटक केली आहे . यामध्ये एक आरोपी भंडारा येथील रहिवासी तर दुसरा आरोपी पुणे येथील रहिवाशी असल्याचे समजले आहे. त्यांच्याकडून आरोग्य सेवक पदाचे बनावट नियुक्तीपत्र आणि त्यासाठी लागणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदाचे बनावट शिक्केही पोलीस पथकांनी आपल्या ताब्यात घेतल्याने मोठी खडबळ उडाली आहे.
विजय यावलकर असे भंडारे येथन अटक केलेल्या आरोपीचे नाव असून व त्याचा सोबत चे पुणे येथील आरोपी यांचे नाव कळू शकलेले नाही . या रॅकेटमध्ये आणखी काही जणांच्या समावेश असून त्यांनाही अमरावती पोलीस लवकरच आपल्या ताब्यात घेण्यात येईल. अशी माहिती अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे.

2
315 views