
चापोलीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू — जबाबदार कोण?
नवनाथ डिगोळे | प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील चापोली गावात भीषण दुर्घटना घडली आहे. ग्रामपंचायतीचा स्वच्छता कर्मचारी गजानन भिसे यांचा बल्ब बसवताना करंट लागून जागीच मृत्यू झाला. गावात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सदरील गजानन भिसे यांचा 22 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा ठरला होता. पण लग्नाचे स्वप्न साकार होण्याआधीच एका क्षणात त्यांच्या आयुष्याची शोकांतिका झाली.
माहितीनुसार, ग्रामपंचायतच्या सूचनेनुसार स्वच्छता कर्मचाऱ्याला दिवाबत्तीचे काम देण्यात आले होते. त्यावेळी विजेचा प्रवाह सुरू असताना तो पोलवर चढून बल्ब बसवित असताना दुर्घटना घडली.
या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. महावितरणचा भोंगळ कारभार की ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा, याचा नेमका तपास होणे अत्यावश्यक आहे.
प्रश्न उपस्थित होत आहेत —
विजेचा प्रवाह बंद न करता काम का दिलं गेलं?
विद्युत सुरक्षेचे नियम पाळले गेले का?
ग्रामपंचायतीने अप्रशिक्षित कर्मचाऱ्याला विद्युत कामावर का पाठवलं?
ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
“एवढं आयुष्य पुढं होतं, पण बेपर्वाईने सगळं संपवलं...” — गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर.