logo

पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; १६५ पैकी ८३ जागा महिलांसाठी राखीव

पुणे : ११ नोव्हेंबर २०२५,
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत महिलांना सर्वाधिक प्रतिनिधित्व देण्यात आले असून, एकूण १६५ जागांपैकी ८३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सोडतीनुसार पुण्यातील ४१ प्रभागांतील जागांचे आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आले आहे.

महिलांसाठी राखीव जागांमध्ये —
🔹 खुल्या प्रवर्गातील महिला : ४८
🔹 ओबीसी महिला : २३
🔹 अनुसूचित जाती महिला : ११
🔹 अनुसूचित जमाती महिला : १

पुरुषांसाठी राखीव जागांमध्ये —
🔹 खुला प्रवर्ग : ४८
🔹 ओबीसी : २२
🔹 अनुसूचित जाती : ११
🔹 अनुसूचित जमाती : १

या सोडतीत कळस-धानोरी-लोहगाव, फुलेनगर-वाघोली, विमाननगर-लोहगाव, वडगावशेरी, कात्रज-आंबेगाव, महम्मदवाडी-उंड्री आदी प्रभागांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले आहे. या निर्णयामुळे महिलांचा राजकीय सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरक्षणावरील हरकती व सूचना १७ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अंतिम यादी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

74
1469 views