logo

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही; आमदार सिद्धार्थ खरात यांचा अधिकाऱ्यांना इशारा

डोणगाव / प्रतिनिधी: सालार बेग

२५ जून २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, इतका काळ उलटूनही शेतकऱ्यांना जाहीर केलेले ८५०० रुपयांचे सहाय्य मिळालेले नाही.

या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी तालुक्यातील तलाठी व इतर अधिकारी मंडळींना इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकरी बांधवांच्या खात्यात तातडीने मदतीचे पैसे जमा करा, अन्यथा मी स्वतः कारवाई केल्याशिवाय राहणार नाही.

आमदारांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, शेतकरी बांधवांना लवकरच मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

33
289 views