logo

रायसिंगपुर व जुना नागरमुथा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश


अक्कलकुवा प्रतिनिधी:(गंगाराम वसावे)
अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपुर व जुना नागरमुथा येथील भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय व कार्यतत्पर आमदार श्री आमश्यादादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार श्री. आमश्यादादा पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून प्रवेश दिला. या प्रसंगी अक्कलकुवा कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती टेडग्या वसावे माजी सरपंच अमरसिंग वळवी, जी.डी.पाडवी, रुपेश चौधरी, यशवंत नाईक, सरपंच दिनेश वसावे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जुना नागरमुथा येथील ग्रामपंचायत सदस्य भरत शिवराम तडवी, शिवराम काशीराम तडवी, गणपत जयराम तडवी, चतुर करसन तडवी, अशोक संपत तडवी, देवा शिवराम तडवी, दिनेश बनशी तडवी, नरेश वसंत तडवी, रीना रविदास तडवी, ललिता देवा तडवी, सुमन शिवराम तडवी, लिलाबाई चतुर तडवी, गीताबाई भरत तडवी, आमश्या दुधा पाडवी, हिरालाल पाडवी, अंजु रामदास पाडवी आदीं सह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

0
132 views