logo

आदिवासी बहुल झरी तालुक्यातील माथार्जून येथे क्रांतिसूर्य बिरसा मूंडा जयंती साजरी

आदिवासी बहुल झरी तालुक्यातील माथार्जून येथे क्रांतिसूर्य बिरसा मूंडा जयंती साजरी

प्रतिनिधी झरी
दि. १५, ता प्र झरी यवतमाळ


आदिवासी बहुल झरी–जामणी तालुक्यात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात आणि अभिमानाने साजरी केली जाते. त्यानुसार माथार्जुन गावामध्येही क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त भारतीय डाक विभाग तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला भारतीय डाक विभाग, यवतमाळ, यांच्याकडून वणी उपविभागीय डाक निरिक्षक अशोक मुंडे व डाक विभागातील सर्व कर्मचारी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा माथार्जुनचे मुख्याध्यापक अविनाश मोरे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.तसेच माथार्जुन येथील सरपंच रवींद्र कायतावर, ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल किनाके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नागोराव दडांजे,तसेच सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार योगेश मडावी यांनी मार्गदर्शन केले.

3
560 views