logo

राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्कारासाठी राज्यभरातून 133 प्रस्ताव प्राप्त : 4 जानेवारीला सन्मान सोहळा....!

राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्कारासाठी राज्यभरातून 133 प्रस्ताव प्राप्त : 4 जानेवारीला सन्मान सोहळा

शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा साप्ताहिक कृषिसेवकतर्फे वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा 8 वा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा येत्या 4 जानेवारी 2026 रोजी रावेर ता रावेर जि जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या दहा गटासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. 15 नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीत या गटातून एकूण 133 प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. एका गटातून प्रत्येकी चार पुरस्कारार्थीची निवड केली जाणार आहे. प्राप्त सर्व प्रस्ताव निवड समितीपुढे पुढील कार्यवाहीसाठी ठेवण्यात आले असून निवड झालेल्या पुरस्कारार्थीच्या नावाची यादी 30 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पुरस्कारार्थीचा गौरव केला जाणार असून यावेळी पुरस्कारार्थीच्या कार्याचा आढावा व परिचय असलेल्या गौरव विशेषाकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. (संपर्क कृष्णा पाटील संपादक, साप्ताहिक कृषिसेवक व मीडिया न्यूजनेटवर्क मो. 9404243515)

0
0 views