logo

काटोल/ नरखेड तालुक्यात समता सैनिक दलाच्या जास्तीत जास्त शाखा स्थापन होण्यासाठी काटोल येथे बैठक पार पडली......!

आज समता सैनिक दलाची बैठक मा. श्री. घनश्यामजी फुसे संघटक समता सैनिक दल तसेच मा. श्री. राजरत्न कुंभारे समन्वयक, मा. श्री. राजू जी मून, मा.प्रमोद रामटेके, मा.हेमचंद्र उके यांच्या प्रमुख उपस्थितीत काटोल येथे पार पडली. नागपूर ग्रामीण व काटोल/ नरखेड तालुक्यात 'गाव तिथे शाखा- घर तिथे सैनिक' याप्रमाणे सामाजिक हितासाठी व लोक कल्याणासाठी समता सैनिक दलाच्या शाखा निर्माण करून एक शिस्तबद्ध पद्धतीने शाखा स्थापन होणार असून, त्यासंदर्भात बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित आयोजक युथ फाऊंडेशन चे संचालक बंडू जी गजबे, प्रा.नरेंद्रजी डोंगरे, लेखक रवीजी दलाल, डॉ.सुनील नारनवरे , सामाजिक कार्यकर्ते बळवंत नारनवरे , प्रा. डॉ.रवी जी सोमकुवर, पत्रकार नीलकंठ गजभिये, विकास सोमकुवर तसेच समता सैनिक दलाच्या महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व संचालन दीपकजी ढोके यांनी केले. तर आभार नरेंद्र डोंगरे यांनी मानले.

43
1632 views