विषयःभूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालय दौंड येथे सुरु असलेल्या गंभीर गैरप्रकारांविषयी तक्रार.?
विषयःभूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालय दौंड येथे सुरु असलेल्या गंभीर गैरप्रकारांविषयी तक्रार
महोदय,
मी, अमर मधुकर जोगदंड, उपाध्यक्ष, नरेंद्र मोदी संघटन टीम, महाराष्ट्र राज्य, यांच्यावतीने ही तक्रार सादर करीत आहे. दिनांक २६/०६/२०२५ रोजी मी भूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालय, दौंड येथे प्रत्यक्ष भेट दिली असता, खालील गंभीर बाबी निदर्शनास आल्याः
तपशीलवार तक्रारः
१. गोपनीय दस्तऐवजांची हाताळणी खाजगी व्यक्तीकडूनः
कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये खाजगी व्यक्ती स्वतः दस्तऐवज हाताळताना फेसबुक लाईव्हद्वारे स्पष्टपणे दिसून आले.
हा प्रकार गोपनीयतेचा भंग असून, सरकारी दस्तऐवजांची सुरक्षा धोक्यात घालणारा आहे.
२. हालचाल रजिस्टरचा अभावः
उपाधीक्षक श्री. धनराज शिंदे हे शासकीय कामासाठी बाहेर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कार्यालयात त्यांच्या हालचालीची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती.
कर्मचाऱ्यांनी 'हालचाल रजिस्टरच ठेवला जात नाही' असे सांगून नियमांचे उल्लंघन केल्याचे
निदर्शनास आले.?