logo

एटापल्लीमध्ये धरती आबा भगवान बिरसा मुंडा १५० वी जयंती उत्साहात साजरी*

*एटापल्लीमध्ये धरती आबा भगवान बिरसा मुंडा १५० वी जयंती उत्साहात साजरी*

रिपोर्टर :शत्रू आतला

धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एटापल्ली येथील विर बाबुराव शेडमाके चौकात आदिवासी समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पूजा-विधी करून विनम्र अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पूजाविधीनंतर सप्तरंगी ध्वजाचे ध्वजरोहण भिवाजी मडावी सर – ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणावेळी परिसरात उत्साहाचे आणि एकतेचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमास अक्षय पुंगटी – अध्यक्ष आदिवासी गोटुल समिती एटापल्ली, शुभम रापंजी – अध्यक्ष आदिवासी युवा समिती एटापल्ली, बी. डी. कुळयेटी सर, गोटा सर, लेकामी सर, मडावी सर, उसेंडी सर, नामदेव हिचामी – पाणी पुरवठा सभापती, नगरपंचायत एटापल्ली, विक्की कोरामी, उमेश पोरतेट तसेच आदिवासी समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कार्यक्रमादरम्यान बिरसा मुंडा यांच्या बलिदान, योगदान आणि आदिवासी हक्कांसाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याचे स्मरण करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.*

आदिवासी समाजाच्या एकतेचा, परंपरेचा आणि स्वाभिमानाचा भव्य असा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व अनुशासनपूर्वक पार पडला.

2
85 views