logo

रस मिलन सत्र पहिले दि.२१ नोव्हेंबर रोजी सायं ५:३० वा.कालिदास कला मंदिर येथे होणार आहे.


---------------
नाशिक - नृत्यश्री गुरु विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या श्वेता चंद्रात्रे,फडणीस, अनुष्का घुगे,रागिणी कुलकर्णी,अदिती गोरे, हलकारे यांची कंपनी कथक आकृती आयोजित रस मिलन सत्र पहिले दि.२१ नोव्हेंबर रोजी सायं ५:३० वा.कालिदास कला मंदिर येथे होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या विद्याहरी देशपांडे यांच्या हस्ते कंपनीचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने श्वेता चंद्रात्रे फडणीस, अनुष्का घुगे,रागिणी कुलकर्णी,अदिती गोरे, हलकारे आदी सह समस्त शिष्य परिवार रस मिलन कथक नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला साथ संगत तबला अद्वय पवार, स्वरः अभिजीत भाटजीरे,सितार प्रतिक पंडित,वेस्टर्न पर्कशन प्रफुल्ल पवार,बासरी समृद्ध कुटे,पढंत वृषाली राव करणार आहे.प्रवेश सर्वांना खुला असून उपस्थित रहावे असे आवाहन कथक आकृती कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

10
141 views