
स्व.नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. येथे दिले अंधश्रद्धा निर्मूलनाविरुद्ध धडे.....
स्व.नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. येथे दिले अंधश्रद्धा निर्मूलनाविरुद्ध धडे.....
प्रयोगाद्वारे अंधश्रद्धेच्या तिमिरातून सुटका.....
जादूटोण्याचे प्रात्यक्षिके; शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता....
पाण्यातून अचानक आग पेटली.., देवाच्या मूर्तीने भराभर दूध प्यायले.., त्याने आमच्यासमोर रिकाम्या हातातून अंगारा काढून दाखवला.., डोळ्यांची उघडझाप करेपर्यंत रिकामा ग्लास पाण्याने भरला होता.., अशा एक ना अनेक जादुई प्रकारांनी प्रत्येकाच्याच मनात कित्येकदा कुतूहल जागवलेले असते. पण हे घडते कसे? खरेच ही जादू, काही चमत्कार आहे की, त्यामागे काही विज्ञान दडले आहे, असे प्रश्नही यातून समोर येत असतात. शालेय विद्यार्थ्यांना असे प्रकार पाहिले की ही जादूच आहे, यावर ठाम विश्वास वाटतो. हा अंधविश्वास, अंधश्रद्धा वेळीच रोखून त्यामागील विज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आज आमच्या स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. मधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून अंधश्रद्धेला दूर सारत विज्ञानाचा दिवा पेटवण्याचे काम केलं आहे.
अशा या अनेक गंभीर घटनांना वेळीच रोखायचे असेल तर लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जादूटोण्यामागे असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन जागवला पाहिजे. या हेतूने शालेय विद्यार्थ्यांमध्ये हा दृष्टिकोन जागवला जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना रिकाम्या हाती अंगारा कसा आला, जळता कापूर खाण्यामागील सत्य काय, देवाची मूर्ती दूध पिते, त्या मूर्तीचा धातू कोणता, त्या धातूत जलपदार्थ कसा शोषला जातो आदी महत्त्वपूर्ण माहिती व त्यात दडलेल्या वैज्ञानिक संकल्पनांची माहिती प्रात्यक्षिकांतून दिली. या प्रात्यक्षिकामध्ये कार्तिक डव्हळे व आर्यन बोडखे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखविली. हे प्रयोग परभणी येथील गफारखान यांच्या मुलाने या सर्व बाबी कशा काल्पनिक आहेत. व आज वेगवेगळ्या यात्रेमध्ये, शहरातील चौका चौकात विद्यार्थ्यांची, समाजाची कशी फसवणूक होत आहे. याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण करून दाखविले.
शिक्षण आणि विद्यार्थी यांचा रोजचा संपर्क असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना जादू, चमत्कारामागील अंधश्रद्धा आणि विज्ञान पटवून सांगितल्यास समाजाला वैज्ञानिक विचाराची दिशा मिळू शकते. जादूटोण्यामागे असलेले विज्ञान समजले तर अंधश्रद्धा पसरणार नाही, या विचाराने आम्ही शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरुकतेचे काम करीत आहोत. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड साहेब व मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.