देवळीतील सुज्ञ मतदारांचा माजी खासदार व विद्यमान आमदार रामदासजी तडस आणि राजेश बकाने यांना थेट सवाल.
साहेब बाले किल्ल्यातील व्यक्तींबाबत एवढा द्वेष का की त्यांचा निवाऱ्याचा अधिकार हीसकाहवून त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य अंधकारात झोकून देण्याचे काम प्रशासनामार्फत पर्यायाने तुमची सत्ता असल्यामुळे तुमच्या मार्फत होत आहे. आणि वर तोंड करून घरोघरी मत मागायला फिरताना लाज कशी नाही वाटत? खरंतर तुम्हाला लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे की 2023 पर्यंत जी जागा कुरण क्षेत्र म्हणून स्टेटस होती ते स्टेटस 2023 मध्ये झुडपी जंगल असे का बदलले गेले व या बदललेल्या स्टेटसमुळे येथील रहिवाशांना पट्टे मिळू शकणार नाही व पर्यायाने कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळू शकणार नाही एक दिवस वनविभागाची नोटीस येईल व सर्वांना उठावे लागेल तर साहेब तुम्ही असे का केले किंवा होऊ दिले? पण वर्षानुवर्ष तुमची मानसिक गुलामी स्वीकारलेले लोक तुम्हाला हा प्रश्न विचारतील की नाही यात शंका आहे पण ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाण आहे जो स्वतःला स्वतंत्र भारताचा नागरिक समजतो कुणाचा गुलाम नाही तो मतदार तुम्हाला याबाबत प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. खरं तर तुम्ही प्रभागात फिरू देण्याच्या लायकच नाही पण ही जनतेची कमजोरी आहे की तुम्ही डोकं वर करून राजरोसपणे प्रभागात फिरत आहात किंवा तुमच्याविषयी लोकांच्या मनात असलेल्या दहशतीचे प्रमाण म्हणा नाहीतर तुम्ही वार्डात फिरू शकला नसता. ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे सोबत डॉक्युमेंट जोडले आहे जो कोणी स्वतःला मानसिक गुलाम समजत नसेल ज्याच्या मनात कोणाची दहशत नसेल त्यांनी नक्कीच मेसेज समोर फॉरवर्ड करावा जेणेकरून सर्व देवळीकर जनतेला साहेबांचे प्रताप माहीत व्हावे आणि फक्त देवळीकर जनतेलाच नाही सर्व महाराष्ट्राला नाही तर देशाला माहित व्हावे.