
मोहपा नगर परिषद: विकासासाठी 'अपक्ष पॅनल'चा एल्गार; नगराध्यक्षपदासाठी श्रीकांत येणूरकर मैदानात*
नगरसेवक पदासाठी प्रिती कावडकर, नबी शेख, अर्चना रेवतकर व प्रकाश मोगरे यांचे तगडे आव्हान*
मोहपा:
मोहपा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणसंग्रामात आता मोठी चुरस निर्माण झाली असून, परिवर्तनाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. 'आश्वासन नको, बदल हवा' आणि 'विकासासाठी श्रीकांतदादा हवा' अशी जोरदार घोषणा देत थेट नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार श्रीकांत मोतीराम येणूरकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. केवळ नगराध्यक्षपदच नव्हे, तर नगरपालिकेत बहुमताने विकास साधण्यासाठी त्यांनी सक्षम उमेदवारांची फळी मैदानात उतरवली आहे. यामध्ये सौ. प्रिती शिवशंकर कावडकर, श्री. नबी मेहबुल्ला शेख, सौ. अर्चना सुनिल रेवतकर आणि श्री. प्रकाश रक्सु मोगरे या उमेदवारांनी कंबर कसली असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या संपूर्ण अपक्ष पॅनलने मतदारांशी थेट संवाद साधत विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.
श्रीकांत येणूरकर यांच्या नेतृत्वात विविध प्रभागांच्या समतोल विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (अ गट) मधून सौ. प्रिती शिवशंकर कावडकर नशीब आजमावत असून महिला सक्षमीकरण आणि प्रभागातील स्वच्छतेवर त्यांनी भर दिला आहे. तसेच याच प्रभागातील ब गटातून (प्रभाग क्र. ४ - ब गट) श्री. नबी मेहबुल्ला शेख निवडणूक रिंगणात आहेत, ज्यांनी सर्वधर्मीय जनसंपर्क आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ९ (व गट) मधून सौ. अर्चना सुनिल रेवतकर या पूर्ण ताकदीने उतरल्या असून प्रभागातील रस्ते आणि नाल्यांच्या प्रश्नावर त्या आग्रही आहेत. यासोबतच प्रभाग क्रमांक १० (ब गट) मधून श्री. प्रकाश रक्सु मोगरे हे युवकांचे प्रतिनिधित्व करत असून, रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी मतदारांना साद घातली आहे. या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन श्रीकांत येणूरकर यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
शहरातील प्रलंबित विकासकामे, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची झालेली दुर्दशा, अनियमित पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची विल्हेवाट यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मत श्रीकांत येणूरकर यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान व्यक्त केले. केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता, प्रभागातील प्रत्येक लहान-मोठी समस्या सोडवण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आमची संपूर्ण टीम कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आता प्रस्थापित नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता, शहराच्या खऱ्या विकासासाठी आणि भविष्यासाठी मतदान करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सध्या या सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रचार फेऱ्या आणि कोपरा सभांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवला जात असून, नागरिकांचा त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, मोहपा शहराच्या अस्मितेसाठी आणि परिवर्तनासाठी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदानात, थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीकांत मोतीराम येणूरकर आणि त्यांच्या नेतृत्वाखालील अपक्ष पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी :सूर्यकांत तळखंडे
9881477824