logo

जननेता डॉक्टर आशिष राव देशमुख वचनपूर्ती एक वर्ष

*जननेता डॉ.आशिषराव देशमुख – वचनपूर्ती एक वर्ष*

सावनेर – कळमेश्वरची वाटचाल : सावनेर नवनिर्माणाकडे

मागील वर्षी आजच्याच दिवशी, म्हणजे 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. सावनेर विधानसभा मतदारसंघात दमदार कामगिरीच्या बळावर आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी 26 हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवत ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणले. या विजयासोबतच सावनेरच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले.

जनतेने दिलेल्या विश्वासाला कर्ज समजून आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी गेल्या एका वर्षात दिवस-रात्र काम करत आरोग्य, शिक्षण, सिंचन, रोजगार, कृषी आदी सर्व क्षेत्रांमध्ये शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून विविध विकासकामांना गती मिळाली आहे.

प्रमुख विकासकामांचा आढावा :

• प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेट देत जनसंवाद व शासकीय दौरे घेऊन नागरिकांच्या समस्या ऐकल्या आणि "जनता दरबार"च्या माध्यमातून अनेक प्रश्न तत्काळ निकाली काढले.

• 10 हजार कोटींच्या खत प्रकल्पासाठी GAIL कंपनीच्या पथकासोबत जागेची पाहणी पूर्ण झाली असून, या प्रकल्पामुळे हजारो युवकांना रोजगार मिळणार असून शेतकऱ्यांना स्वस्त दरात युरिया व खते उपलब्ध होणार आहेत.

• कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे 70 हजार कोटींचा गॅस कोलिफिकेशन प्रकल्प प्रस्तावित असून यामुळे सुमारे 30 हजार युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

• पूर्वी गुन्हेगारीसाठी ओळख असलेल्या सावनेरला नवी ओळख देत विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचे भूमिपूजन करण्यात आले, ज्यामुळे राष्ट्रभक्तीची भावना अधिक बळकट झाली.

• संपूर्ण मतदारसंघात कॅन्सरमुक्त अभियान राबवून अनेकांना जीवनदान मिळाले.

• आमदार हेल्थ कार्डचे वाटप व माऊली फाउंडेशनअंतर्गत नागपूर येथे उपचारासाठी मोफत बससेवा सुरू.

• पाटनसावंगी येथील अवैध टोलनाका कायमस्वरूपी बंद.

• पाटनसावंगी ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक सुविधांसह सुरू.

• गणपती मंदिर जीर्णोद्धारासाठी 6 कोटी रुपयांचे भूमिपूजन.

• सावनेर-कळमेश्वर येथे खेळाडूंकरिता फूटसल ग्राउंड उपलब्ध.

• कळमेश्वर रेल्वे गेटवरील उड्डाणपुलासाठी 55 कोटी रुपयांचे भूमिपूजन.

• शेतकऱ्यांना झटका मशीनचे वाटप.

• खापरखेडा परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस स्टेशन नागपूर शहर अखत्यारीत वर्ग.

• मोहपा येथे नवीन पोलीस स्टेशन सुरू.

• सावनेर शहरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

• दिव्यांग नागरिकांना ई-रिक्शा व आवश्यक साहित्याचे वाटप.

• शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी जालना , नाशिक, संभाजीनगर येथे शेतकऱ्यांना सोबत नेऊन अभ्यास दौरा केला. महाराजस्व अभियान मोठया प्रमाणात राबविण्यात आले, आदर्श शिक्षण प्रणाली स्वीकारून शिक्षण पद्धत्ती मध्ये सुधारणा केली गेली. आमदार डॉ आशिषराव देशमूख यांनी भाषणात बोलून दाखवले की, शिक्षण क्षेत्रात सावनेर पॅटर्न निर्माण करू.

ही तर मोजकीच कामे झाली पण यासारखे असंख्य विकास कामे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात सुरु आहेत. 25 वर्षाचा खंडलेला विकास 1 वर्षातच होताना दिसत आहे, म्हणजेच आमदार डॉ. आशिषराव देशमुखाच्या विकासाच्या दूरदृष्टीने सावनेर नवनिर्माण होत आहे.

463
17410 views