logo

शिव सेना प्रणित " शिव उद्योग संघटनेचे" नागपूर येथे महिला, युवक,शेतकरी सक्षमीकरणाच्या संदर्भात चर्चा सत्राचे आयोजन

शिव सेना प्रणित शिव उद्योग संघटनेचे महिला, युवक, गौपालक, आणि शेतकरी यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर येथे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री दिपकजी काळीद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ह्या अधिवेशनात संपूर्ण विदर्भातील संघटनेचे महिला आणि पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे सरचिटणीस श्री प्रकाशजी ओहळे यांनी उत्पादनांच्या वितरण व्यवस्थेसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी उत्पादने आणि मुल्यवर्धित शेती तसेच शेती पूरक व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रियेतून केले जाणारे वेगवेगळे प्रकार,देशी गौवंश आधारित शेती तसेच पंचगव्ये उत्पादने निर्मिती याबद्दलचे मार्गदर्शन कृषी समिती प्रमुख आणि शिव उद्योग संघटना उपाध्यक्ष श्री गोकुळ लगड यांनी केले. उपस्थित पदाधिकाऱ्यां बरोबर चर्चा करुन विदर्भातील जंगलात मिळणारे वनऔषधे, रानभाज्या तसेच मध, मोहाच्या फुलांपासून बनणारे विविध पदार्थ, महिलांनी बनविलेल्या हस्तकला वस्तू, खाद्य पदार्थांचे नमुने मुंबईत येत्या २५ नोव्हेंबर रोजी शिव उद्योग संघटना आणि काही परदेशी कंपन्या यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या अधिवेशनात निरिक्षणासाठी पाठविण्यात आले.
सदर अधिवेशनात संघटनेचे गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख श्री मनोज गेडाम, महिला सचिव सौ.योगिताताई मेश्राम,अहेरी तालुका महिला आघाडी संघटक अरुणा ताई औतकर, अहेरी तालुका कृषी समिती सदस्य सिंधुताई मेश्राम, विधानसभा संघटक लंकेश्वर कांबळे ,यवतमाळ,वर्धा, वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख सौ.धनश्रीताई पाटील, यवतमाळ महिला जिल्हा प्रमुख सौ.वर्षाताई निघोट, वर्धा जिल्हा प्रमुख श्री सुनील गवळी, चंद्रपूर जिल्हा प्रमुख श्री सुशांत बेले, अकोला जिल्हा प्रमुख श्री रविंद्र टिकार आणि महिला जिल्हा प्रमुख सौ.अलकाताई देशमुख हे पदाधिकारी हजर होते . तसेच गडचिरोली ,यवतमाळ जिल्हा कृषी समिती प्रमुख , नागपूर विभाग जिल्हा प्रमुख अशा विविध पदांवर अध्यक्षांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते श्री धनंजय पाटील यांनी संयुक्तीक शेती प्रकल्प सुरू करण्याबरोबरच शिव उद्योग संघटनेबरोबर काम करण्याची तयारी दाखवली. शेतीतील नवीन प्रयोग म्हणून मल्टिलेअर फार्मिंगचे तरुण इंजिनिअर विवेक याने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे सुरू केलेले काम संपूर्ण विदर्भात चालू करण्याची रुपरेषा तयार करण्यात आली . यवतमाळ येथील तरुण उद्योजक रवींद्र देशमुख यांनी सेंद्रिय शेती तसेच पंचगव्ये उत्पादने निर्मिती करुन आपल्या भागातील शेतकऱ्यांना मोफत वाटप चालू केले आहे, याचा लाभ इतर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांनाही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.शिव उद्योग संघटना विदर्भ संघटक श्री रघुनाथ लोखंडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मेहनत घेऊन ह्या अधिवेशनाचे यशस्वी आयोजन केले.विदर्भातील केवळ जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद बघता प्रत्येक जिल्ह्यात अशा चर्चा सत्रांचे आयोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रवी भवन येथे अधिवेशनासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या अधिकाऱ्यांचे आभार संघटनेतर्फे मानण्यात आले.संपूर्ण दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाचा समारोप संध्याकाळी ६.०० वाजता करण्यात आला.

54
2381 views