जनतेचा आवाज बनण्यासाठी सज्ज — दिपक पाटील वाघोदेकर लवकरच मोठा निर्णय घेणार!”
“जनतेचा आवाज बनण्यासाठी सज्ज — दिपक पाटील वाघोदेकर लवकरच मोठा निर्णय घेणार!”
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
जानवे–मंगरूळ गटात कै. धनगर अर्जून पाटील यांचे नातू दिपक पाटील वाघोदेकर हे जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात चर्चेतील युवा नेतृत्व ठरत आहेत. शिंदे गट, शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस — सर्वच पक्षांनी त्यांना उमेदवारीसाठी आमंत्रण दिले असून गावोगावी त्यांना जबरदस्त पाठिंबा मिळत आहे.
दिपक पाटील म्हणाले,
“पक्षांकडून सतत फोन येत आहेत, पण माझा निर्णय जनता आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच घेणार. माझी उमेदवारी ही सत्तेसाठी नाही… शेतकरी व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी असेल.”
शेतकरी प्रश्न, निसर्डी धरणाचे पुनर्जीवन, हमीभाव, ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा केंद्र अशा मुद्द्यांवर काम करण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गावोगावी वाढत चाललेल्या उत्साहामुळे दिपक पाटील वाघोदेकर यांच्या प्रवेशाने या निवडणुकीत नवे समीकरण तयार होणार हे निश्चित झाले आहे.