logo

**अजितदादांच्या दौऱ्यापूर्वी बीडमध्ये धडाकेबाज साफसफाई

शहर झाला चकचकीत महाराष्ट्र!**
बीड | प्रतिनिधी shaikh galib
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आजच्या बीड दौऱ्याची अधिकृत घोषणा नसतानाही, शहरातील प्रशासन आणि स्वच्छता विभाग आज सकाळपासून पूर्णपणे मैदानात उतरले. मुख्य मार्गांवर अचानक मोठ्या प्रमाणात साफसफाई मोहीम राबवली गेली, ज्यामुळे रस्ते अक्षरशः चकचकीत दिसू लागले.
बीड शहरातील प्रमुख चौक, मध्यम नाल्याजवळील परिसर आणि महामार्गाच्या कडेला महिला कर्मचारी, सफाई कामगार झाडू आणि उपकरणांसह काम करताना दिसले. ट्रॅक्टर, क्रेन आणि वाहनांची ये-जा सुरू होती, तर वाहतूक काही काळ संथगतीने सुरू होती.
नागरिकांनी या हालचालींकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले असून, “दादा येत आहेत म्हणून बीड चमकतोय,” अशी चर्चा शहरात रंगली आहे. रस्त्यांवरील धूळ, कचरा आणि अडथळे दूर केल्यानंतर संपूर्ण मार्ग व्यवस्थित दिसू लागला आहे.
अधिकृत कार्यक्रम वेळ न जाहीर असूनही, प्रशासनाची तयारी मात्र ‘व्हीआयपी मोड’मध्ये असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
आजच्या दौऱ्यामुळे बीडचे राजकीय तापमान वाढले असून, शहर आज दादांच्या स्वागतासाठी सज्ज दिसत आहे.

122
7615 views