logo

*ज्येष्ठ कवी अशोक भालेराव यांच्या *माझी धम्मयात्रा पुस्तकाचे शनिवारी नाशिक येथे प्रकाशन!*.....


गांधीनगर मुद्रणालयातील औषध निर्माण अधिकारी,ज्येष्ठ कामगार कवी अशोक भालेराव यांच्या माझी धम्मयात्रा ह्या प्रवासवर्णन पर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मातृभूमी प्रबोधन समिती, जेलरोड, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी पाली भाषा व बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासक सुशीला संतोष जोपुळकर यांचे हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून,प्रमुख वक्ते म्हणून आचार्य नंदकिशोर साळवे,
बौद्धचार्य प्रकाश जगताप,अनिकराव गांगुर्डे तसेच सुप्रसिद्ध जेष्ठ गीतकार लेखक गणेश डी.साळवे पुस्तकावर भाष्य करणार आहेत तर समारंभाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.गंगाधर अहिरे उपस्थित राहणार आहेत.
श्री भालेराव यांचे यापूर्वी *काहूर* व *पोस्टमॉर्टम* हे दोन कवितासंग्रह प्रकाशित असून ते सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात गेले ३२ वर्षापासून कार्यरत आहेत. भारत सरकारच्या युवा संस्कृती मंत्रालयातर्फे त्यांना सन १९९९ मध्ये नेहरू युवा पुरस्कार ही मिळालेला असून गांधीनगर मुद्रणालयाचे ते गुणवंत कामगारही आहेत.

162
9314 views