टिटवाळा बॉक्सिंग क्लबचा मुंबई विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत दमदार विजय ,
टिटवाळा - मुंबई विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा 2025–26 मध्ये टिटवाळा बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली.
यात नवेश मैराळे याने 70–75 किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले, त्यांच्या तडाखेबाज खेळ, उत्कृष्ट कौशल्य आणि जिद्दीमुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तर नारायण सिंग याने 75–80 किलो वजन गटात कांस्य पदक जिंकले, स्पर्धेत त्यांनी दाखवलेली तंत्रशुद्ध खेळशैली आणि चिकाटी प्रशंसनीय ठरली.
दोन्हीही खेळाडू प्रशिक्षक संतोष मुंढे यांच्याकडे टिटवाळा बॉक्सिंग क्लबमध्ये नियमित प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि शिस्तबद्ध सरावामुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली.
टिटवाळा बॉक्सिंग क्लबतर्फे दोन्ही बॉक्सरना मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा!