logo

राष्ट्रीय प्रेस दिन साजरा करण्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मीडियाचा सदुपयोग व दुरूपयोगा. वि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आळंदी (रवि.कदम) : येथील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० (NEP) अनुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘विद्यार्थी समूह’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रेस दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये समाज प्रबोधन करणे आणि माध्यमांच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे हे होते.
‘समाज माध्यम व प्रसिद्धी समूह’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहशिक्षक समाधान मादक होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन मेदनकर, संदीप रंधवे, रोहिदास कदम, हमीद शेख, कृष्णाजी डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना संदीप रंधवे यांनी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा समतोल व योग्य पद्धतीने वापर करावा, अवांतर वाचनाची सवय लावावी असे आवाहन केले.
हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी प्रेस दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजमाध्यमे ही केवळ मनोरंजनासाठी नसून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात, तसेच वाचन संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयांचा वापर वाढवावा, वृत्तपत्रांचे वाचन करावे असे त्यांनी सांगितले.
रोहिदास कदम यांनी सोशल मीडियाच्या सदुपयोग व दुरुपयोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फेसबुक, ट्विटर, वॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, युट्युब यांसारख्या माध्यमांचा वापर आवश्यक तेव्हाच आणि जबाबदारीने करावा, अन्यथा विद्यार्थी भरकटण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात श्रीम. के. एन. देवकर, जी. पी. पालवे, समाधान आदक यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. के. एन. देवकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जी. पी. पालवे

19
1274 views