logo

सांगली जिल्ह्यात झोमॅटो रायडर यांचा बेमुदत संप लाखोचे नुकसान

दिनांक 25 /11/ 2025 पासून झोमॅटो रायडर आणि सांगली जिल्हा येथे बेमुदत आंदोलन पुकारले होते कारण झोमॅटो रायडर यांना दिवसभर दहा तास काम करून 600 रुपये अर्निंग होत आहे 300 रुपये पेट्रोलला गेल्यानंतर तीनशे रुपये मिळतात एवढे होत असून दिवसाचा इन्सेटिव्ह बंद केला आहे म्हणून अगोदर प्रसार माध्यमांमध्ये ही न्यूज लावून त्यांना सांगितलं होतं २५ तारखेपर्यंत आपला मत आम्हाला सांगावे एवढे सांगूनही सांगली जिल्ह्याचे टी एल नेत्रदीप यांनी कोणती ॲक्शन घेतली नाही व जी लोक स्ट्राइक करणार आहेत त्यांच्या आयडिया ब्लॉक केले आहेत तसेच त्या रायडरना फोन लावून धमकी देण्याचे कार्य करत आहेत कामावर या नाहीतर आयडिया ब्लॉक करेन पोलीस स्टेशनचं नाव सांगून सर्वांना धमकावत आहेत एवढं होऊनही आज तागायत यांच्याकडून कोणतेही एक्शन घेण्यात आलेले नाही म्हणजेच रायडर यांची कुचुंबना करायचं जो झोमॅटो ने ठरवला आहे म्हणून आज दिनांक 26/11/2025 रोजी आम्ही सर्व रायडर एकत्र येऊन सर्व पत्रकारांना बोलवून पत्रकार परिषद घेणार आहे आणि आमच्या व्यथा आज मांडणार आहे

233
11111 views