
सौ.अश्विनी जाधव, मोहीत व्यवहारे यांच्या प्रचाराला मिळाली गती..
मा. आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन!
सौ.अश्विनी जाधव, मोहीत व्यवहारे यांच्या प्रचाराला मिळाली गती..
चिखली/सत्य कुटे :
नवा चेहरा,आश्वासक नेतृत्व
वेळ बदलाची .साथ युवा नेतृत्वाची!
बदलाची लाट नाही,विकासाचे वादळ असल्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी
चिखली नगरपालिका प्रभाग क्र. १४ (अ) मधील कार्यालय उद्घाटन प्रसंगी केले. या प्रभागातील उच्च शिक्षित युवा चेहरा सौ.अश्विनी विश्वनाथ जाधव यांच्या उमेदवारीने संपूर्ण प्रभागाची राजकीय हवा बदलून गेली असल्याचे ही त्यांनी सांगितले.
जिथे जिथे सौ.अश्विनी जाधव जात आहेत, तिथे तिथे लोकसमर्थनाचा प्रचंड जंगी उत्साह पाहायला मिळतोय . हे स्पष्ट संकेत आहेत की, या वेळेला प्रभागातील जुनी राजकारणी समीकरणे पूर्णपणे कोसळणार आहेत! नव्या नेतृत्वाची, नव्या विचारांची, नव्या दमाची गरज आता जनतेने ठामपणे व्यक्त केली आहे! प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर, प्रत्येक चौकातून एकच घोष… “यावेळी प्रभाग १४ मध्ये दमदार बदल!”
“या वेळी युवा नेतृत्व!” जनतेच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास, गर्दीचं प्रमाण, भेटीगाठींमधील उत्साह… हे सगळं सांगतंय आहे. युवा नेतृत्वाची ताकद, जनतेचा आशीर्वाद आणि बदलाची अपरंपार इच्छा— या तीन गोष्टींनी प्रभाग १४ मध्ये ( अ ) ही फक्त निवडणूक नाही… ही जनतेची क्रांती आहे!
यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. हे विशेष!
चला,विकासात्मक बदलासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख, नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. अश्विनी विश्वनाथ जाधव, मोहीत धनंजय व्यवहारे यांच्या कमळ निशाणी समोरील बटण दाबून तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करू! असे प्रभागातील नागरिकांच्या चर्चेत बोलले जात आहे.ऐवढे मात्र निश्चित!