logo

शेवगावात उद्या 'शिवसेने'चा एल्गार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वाजणार विजयाचा बिगुल!


शेवगाव | प्रतिनिधी
शेवगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत शिवसेनेने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, आता खुद्द पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे हे मैदानात उतरणार आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची भव्य तोफ गुरुवारी (दि. २७) शेवगावात धडाडणार आहे.
विकासाचे नवयुग सुरू होणार
शहरातील खंडोबा मैदान येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 'शेवगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपार विश्वासातून विजयाचा बिगुल वाजणार', असा नारा देत शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. या सभेतून शेवगावच्या विकासाचे नवयुग सुरू होईल, असा विश्वास स्थानिक नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. या सभेत शिंदे विरोधकांचा समाचार घेण्यासोबतच शेवगावच्या विकासासाठी कोणती नवीन घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तसेच जनशक्ती विकास आघाडी चे अध्यक्ष मा श्री शिवाजीराव काकडे आपल्या कार्यकत्या सोबत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
सभेचा तपशील:
• प्रमुख उपस्थिती: ना. एकनाथराव शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा मुख्य नेते, शिवसेना)
• दिनांक: गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५
• वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
• ठिकाण: खंडोबा मैदान, शेवगाव
तरी या ऐतिहासिक सभेस आणि विकासाच्या पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी शेवगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना पक्षातर्फे करण्यात आले आहे

67
1674 views