logo

संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून बोरिस येथे संविधान दिवस साजरा...!

बोरिस.ता.जि.धुळे(महाराष्ट्र). 26/11/2025...
आज दि.26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनाच्या दिवशी बोरिस ता. जि. धुळे या ठिकाणी समाज बांधवांकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला.
विश्वरत्न, महामानव बोधिसत्व, भारताच्या संविधानाचे निर्माते,बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बोरिस येथील समाज बांधवांकडून भारताच्या संविधातील प्रास्ताविकेचे सार्वजनिक रित्या वाचन करून हा गौरवशाली दिवस साजरा करण्यात आला.सर्व समाज बांधवांकडून संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला सन्मा. भीमराव शंकर बोरसे (माजी सैनिक ), सन्मा. निंबा चंद्रभान बोरसे(माजी ग्रामपंचायत सदस्य बोरिस), सन्मा. सुनील राजाराम बोरसे(युवा उद्योजक)सन्मा.नागमल गुरुजी(सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक). सन्मा. सारनाथ बोरसे सर(Hounarable member of Justice and Rights Committee india) सन्मा. संदीप बोरसे.(सामाजिक कार्यकर्ते )सन्मा. सनी निंबा बोरसे(सामाजिक कार्यकर्ते) हे उपस्थित होते.

9
411 views