logo

विरदेल येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा...


विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील

श्रीमंत गो.सं. देवकर विद्यालय विरदेल ता शिंदखेडा जि. धुळे येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ बुधवार रोजी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम घेण्यात आला सदर उपक्रमात मूल्यवर्धन प्रशिक्षित शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे एस पाटील व पर्यवेक्षक श्री एस एस गोसावी व सांस्कृतीक विभाग प्रमुख श्री आर एच ठाकूर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.तसेच विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री सुनील चौधरी यांनी संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेतला व यानंतर श्री सुनिल चौधरी,श्री आर एच ठाकूर,श्री बी एस सिसोदे पर्यवेक्षक श्री एस एस गोसावी यांनी संविधान महत्व सांगितले व मुख्याध्यापक श्री जे एस पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भारतीय संविधानाबद्दल माहिती दिली
व नंतर संविधान सन्मान रॅली गावातून काढण्यात आली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामुदायिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व शाळेत श्री मिलिंद पाटील व सौ जे ए निकवाडे यांनी शाळा स्तरावर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले सदर कार्यक्रमासाठी श्री सुनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन तर आभार श्री जी एन बेहेरे यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले

20
271 views