logo

"अंधारयात्रा" नाटकाच्या माध्यमातून झाले राजसत्ता आणि प्राचीन परंपरावादाचे दर्शन"

नांदेड च्या नाट्य रसिकांची वाढती गर्दी

नांदेड ः सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ च्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर बुधवार ता. २६ रोजी तन्मय ग्रुप, नांदेड च्या वतीने नाथा चितळे लिखित आणि दिग्दर्शित 'अंधारयात्रा'' हे नाटक सादर करण्यात आले. शंकरराव चव्हाण नाट्यगृह नांदेड येथे झालेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांनी चंगलीच गर्दी केली.

अंधारयात्रेच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक नाथा चितळे यांनी गणाचार्यांच्या रूपक कथेतून प्रतिकात्मक पद्धतीने सद्य समाजव्यवस्था मांडण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील, नात्यातील फसवणूक, बेभरवशी लोकं, राजसत्तेकडून होणारा विश्वासघात आणि मुळात परंपरांनी चालत आलेले ज्ञान, रूढी-परंपरा यांचा खरा अर्थ समजून न घेता स्वीकारलेले अंधानुकरण, हे सगळे सोप्या पद्धतीने या नाटकाच्या माध्यमातून प्रभाविपणे मांडण्यात आले.

कथेला अनुसरून प्राचीन नैपथ्य, रंगभूषा आणि वेशभूषा ही नाट्य रसिकांना प्राचीन युगातील संवाद आणि दृश्यांचा अनुभव देत होती. नाटकातील दृश्ये आणि आणि दृश्यांची गरज ओळखून योग्य संगीत आणि प्रकाश योजना यामुळे नाटकातील दृश्ये प्रभाविपणे प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली.

या नाटकात गणाचार्य धर्मानंद यांची भूमिका(डॉ. जगन्नाथ (नाथा) चितळे) यांनी केली तर गांधारी देवी यांची निलिमा चितळे यांनी केली. सुनबाई च्या भूमिकेत (शुभांगी वाणी) तर योगिनी च्या भूमिकेत( डॉ.भारती मढवई) होत्या. कर्मानंद म्हणून(अक्षद चंद्रवंशी), ज्ञानानंद (अमोल काळे), राजा वीरकेतु ( सुनील कवठेकर ), अतिथी (श्रेयश यादव), स्वरूपानंद - (विवेक भोगले), साधक/पुरोहित (अधिराज जालनेकर (बालक), साधक ( प्रसन्न सोनटक्के), साधक (आयुष गावंडे ), साधक (आशिष पांचाळ), सेनापती (विक्रम इंगोले), सैनिक (श्रीकांत पंडित ), सैनिक (रोहित जोंधळे ), सैनिक (आकाश पांचळ ) , सैनिक (अनिकेत इंगळे), सैनिक (ऋतिक पुंडे ), यवन युवक (नागेश लोकडे ) यांनी भूमिका पार पाडली.

त्याचप्रमाणे तंत्रज्ञाची भूमिका नैपथ्य (अमोल गादेकर / सुभाष होरसुर), प्रकाश योजना (चेतन धवले/ नागेश लोकडे) ,संगीत (भूषण भावसार), रंगभूषा (गजेश्विनी देलमाडे), वेशभूषा (डॉ. नेहा चितळे) यांनी केली.

मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा ही सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालायाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

0
88 views