logo

*परतूर नगरपरिषद निवडणूक प्रचाराला प्रचंड वेग* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार या अतिविराट जाहीर सभेला मार्गदर्शन* *भाजपा च्या जाहीर सभेला उपस्थित

परतूर : परतूर नगरपरिषदेच्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी आता चुरशीची होत असून भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा जोर अधिक वाढवला आहे. शहरात, प्रभागनिहाय, बूथनिहाय सभा, पथनाट्य, जनसंपर्क मोहिमा यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच आता भाजपकडून आणखी एक भव्य राजकीय शक्तीप्रदर्शन होणार आहे. परतूर शहरातील मोंढा भागात 28 नोव्हेंबर 2025 रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता भाजपची अति विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे विशेष उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. परतूरला सातत्याने वेगवान विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधी, योजना व सुविधा याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या सभेबाबत माहिती देताना म्हटले की, "परतूरच्या सर्वांगीण विकासासाठी मागील काही वर्षांत विविध प्रकल्पांना गती मिळाली आहे. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, खेळ आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सुरू असलेल्या कामांच्या पुढील टप्प्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. परतूर शहराचा विकास आराखडा अधिक मजबूत करण्यासाठी ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे." उद्या होणाऱ्या या सभेमध्ये संपूर्ण शहरातून कार्यकर्ते, नागरिक, महिला, युवा, व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. भाजपकडून या सभेच्या तयारीसाठी महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून जोमाने तयारी करत आहेत. नगरपरिषद निवडणुकीत शहराच्या विकासाबाबत प्रमुख चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबतच्या अपेक्षा, भविष्यातील प्रकल्प, स्मार्ट शहराची दिशा, वाहतूक व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याचा प्रश्न व नवीन योजना असा व्यापक विषयांचा गुंता असून या सर्व विषयांवर सभेतून महत्त्वपूर्ण संदेश मिळेल, अशी चर्चा शहरात आहे. भविष्यातील नगरपरिषद कोणत्या दिशेने कार्य करणार याबाबत शहरात रसिकतेने चर्चा रंगली आहे. भाजपची ही सभा निवडणुकीतील निर्णायक क्षण मानली जात असून विरोधी पक्षांचेही लक्ष या सभेकडे लागले आहे. आमदार लोणीकर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “उद्या सकाळी 10 वाजता मोंढा भागात होणाऱ्या या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. परतूर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सभा महत्वपूर्ण ठरेल.” या विराट सभेमुळे परतूरमधील निवडणूक वातावरण अधिक तापणार असून आगामी काही दिवसांत प्रचाराची लढत अधिक रंगणार हे निश्चित आहे.

0
88 views