logo

नांदेड जिल्हातील देगलुर ते तीर्थक्षेत्र शेगाव पायी दिंडी पालखी दि .26 जानेवारी ते 07 फेब्रुवारी पर्यंत होणार

देगलूर : ( संदीप उ . भालेराव राज्य कार्यकारी संपादक )
देगलूर शहरातून प्रतिवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराज व श्री दत्तात्रय महाराज मंदिर देवस्थान तर्फे दिनांक 26 जानेवारी 2026 ते 07 फेब्रुवारी 2026पर्यंत देगलूर ते श्रीक्षेत्र शेगाव पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .हे पायी दिंडी पालखी यात्रा श्री गजानन भक्त व श्रद्धाळू यांना कोणताही मोबादला न घेता पालखी सोहळा श्री गजानन महाराज व श्री दत्त मंदिर देगलूर येथून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी दहा वाजता निघत आहे .पायी दिंडीचे हे तिसरे वर्ष आहे
दिनांक 26 जानेवारी ते दिनांक 07 फेब्रुवारी 2026पर्यंत पायी दिंडी पालखी शेगावला दाखल होणार आहे टप्प्याटप्प्याने पायी दिंडी शेगाव पर्यंत जाणार आहे भक्तांची चहा नाश्ता व जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .या भक्तांना पायी दिंडी सोबत जायचे आहे त्यांनी संस्थांच्या वतीने श्री .रमेश कंतेवार ( माजी पोलीस उप -अधीक्षक तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व संस्थान चे अध्यक्ष ) मो नंः9823047501, श्री . सायलू तैदलवार 9766165151, श्री.व्यंकटेश पबितवार 9423961111, श्री.दिनेश मुनगीलवार9503890679,श्री .अशोक पेन्शलवार 8275350560, श्री.शंकराप्पा मठवाले 9970394182, श्री. अशोक साखरे 8421435000, श्री .सत्यनारायण तोटावार 81493556282, यांच्या कडे नाव नोदणी करावी असे आवाहन संस्थान तर्फे करण्यात आले आहे . श्री गजानन महाराज व श्री दत्तात्रय महाराज मंदीर संस्थान तर्फे अनेक उपक्रम दर वर्षी राबविण्यात येत आहेत .त्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .


Write Your Comment...

21
366 views