
उदगीरच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस .
सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा . प्रत्येक लाडकी बहिण लखपती दिदि बनावी . मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस .
( विशेष प्रतिनिधी )
उदगीर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तालुका क्रीडा मैदानावर माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य सभा पार पडली. सभेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी लातूर जिल्ह्याच्या व उदगीर शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करत, भुयारी नाली प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांचा निधी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केल्याची घोषणा केली. तसेच दुसऱ्या टप्प्याचा निधीही लवकरच प्राप्त होणार असून संपूर्ण उदगीरला नालीमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, लाडकी बहीण योजना अशाच प्रकारे सुरू ठेवत, प्रत्येक बहीण ‘लखपती दीदी’ बनावी यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. स्वातीताई हुडे यांच्यावर विश्वास टाकत जबाबदारी दिली.
उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
या सभेला माजी केंद्रीय मंत्री भगवंतजी खुब्बा , माजी मंत्री व निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री व उदगीरचे आमदार संजय बनसोडे, औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड, माजी खासदार सुधाकरजी शृंगारे, माजी आमदार त्रंबक भिसे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी खासदार सुनील गायकवाड, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भारत चामे,h माजी जि .प . अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे,सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. स्वातीताई हुडे, अहमदपूर नगर परिषद चे भाजपाचे उमेदवार अॅडहोकेट स्वप्नील व्हते,तसेच नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार आणि स्थानिक कार्यकर्ते - पदाधिकारी व सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.