logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रिसोड़ नगरपरिषद क्षेत्र में 11 केंद्रों पर 71.24 टक्के मतदान

रिसोड़ | नगरपरिषद निवडणुकीत रिसोड़ शहरातील सर्व 11 मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत एकूण 71.24 टक्के मतदान झाले. उपलब्ध माहितीप्रमाणे 29,962 नोंदणीकृत मतदारांपैकी 21,346 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

प्रत्येक मतदान केंद्रावरील नोंद पुढीलप्रमाणे—

सानेगुरुजी फुले उच्च प्राथ. शाळा, मालेगाव रोड – 3354 पैकी 2388 (71.20%)

भारतीय प्राथमिक शाळा, रिसोड़ – 2810 पैकी 1970 (70.11%)

महात्मा गांधी उ.प्रा. शाळा, रिसोड़ – 2067 पैकी 1396 (67.54%)

स्व. पाटील महाविद्यालय केंद्र – 2671 पैकी 1813 (67.88%)

उम्मेद बागडिया (जनता कॉलेज) – 1623 पैकी 1131 (69.69%)

श्री शिवाजी विद्यालय – 2617 पैकी 1866 (71.30%)

सानेगुरुजी कन्या शाळा – 2436 पैकी 1791 (73.52%)

भारत माध्यमिक शाळा (केंद्र 1) – 2555 पैकी 1731 (67.75%)

भारत माध्यमिक शाळा (केंद्र 2) – 2978 पैकी 2175 (73.04%)

श्री सिद्धार्थ प्राथमिक विद्यालय – 2600 पैकी 1993 (76.65%)

अहमदिया उर्दू प्राथमिक शाळा – 4251 पैकी 3098 (72.74%)

सर्व केंद्रांवर मतदान शांत, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडले. सकाळपासूनच अनेक केंद्रांवर मतदारांची उपस्थिती दिसून आली असून स्थानिक मतदारांनी सक्रिय सहभाग देत लोकशाही प्रक्रियेला बळकटी दिली.

✍️ प्रतिनिधि – शेख शहेज़ाद

60
1320 views

Comment