logo

आरोग्य विमा नाकारणाऱ्या केयर हेल्थ इन्शुरन्स कंपनीला अहिल्यानगर जिल्हा तक्रार निवारण आयोगाचा दणका

श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील आरोग्य विमा धारक भागचंद अभिमान नवगिरे यांनी केयर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चीं आरोग्य विमा पॉलिसी घेतली होती. सदरील पॉलिसी कालावधीत पॉलिसी धारक आजारी पडले असता त्यांनी श्रीरामपूर येथील कुटे हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले तसेच उपचार घेण्यापूर्वी कंपनी च्या कस्टमर केयर ला याबाबत कल्पना दिली होती. परंतु उपचार पूर्ण झाल्यावर हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यावर क्लेम साठी अर्ज केला असता कंपनी ने क्लेम नाकारला. यासाठी कारण दिले कीं सदरील हॉस्पिटल आमच्या निवड केलेल्या हॉस्पिटल मध्ये नाहीं. त्यामुळे ग्राहक भागचंद नवगिरे यांनी अहिल्यानगर ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली. सदरील तक्रारीवर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून निकाल देण्यात आला कीं हॉस्पिटल चे झालेले बिल ६१९०५ रुपये तसेच सदरील रक्कमेवर २ वर्षाचे ९%दराने व्याज देण्याचे आदेश दिला. तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी दहा हजार रुपये व तक्रारीचा खर्च सात हजार रुपये इतकी रक्कम ३० दिवसात देण्याचे आदेश केले.
सदरील तक्रारी करिता ऍडवोकेट सिद्धार्थ वाघमारे यांनी काम पाहिले.
सदरील निकालामुळे जिल्हात ४०% क्लेम हे हॉस्पिटल निवड यादीत नसल्या मुळे नाकारण्यात आलेले आहेत. गेल्या २ वर्षांमध्ये त्यामुळे या निकालचा आधार घेऊन अनेक लोकांचे क्लेम चे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे -

68
3047 views