logo

सोलापूरविहिरीत पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; कृषी विभागाची विहीर बनली धोकादायक

महेश बसवराज बिराजदार वय 26 राहणार बनशंकरी नगर शेळगी  असे मयत तरुणाचे नाव आहे, मार्केट यार्ड ते शेळगी ब्रिज दरम्यान सर्विस रोड लगत असलेल्या कृषी विभागाच्या आरक्षित असलेल्या शेतातील विहिरीत एक तरुण पडला असल्याचे समजल्याने पोलीसांनी त्वरित फायर ब्रिगेडला माहिती दिली, नंतर त्यास फायर ब्रिगेडच्या सहाय्याने बाहेर काढून पोलीस नाईक जीआर धुमाळ यांनी यादीसह उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे सोमवार सकाळी  9 वाजून 50  मिनिटांनी दाखल केले .
असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे,  याची नोंद सिव्हिल पोलिस चौकी येथे झाली आहे. तेथील असलेल्या विहिरीला लवकरात लवकर तटबंदी बांधून घेण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक व समाजसेवकांनी केली आहे.

117
14899 views