logo

* भारतीय राष्ट्रपतीच्या निर्णय दये अर्जाचे फेटाळणीचे स्वागत ऑल इंडिया मिडिया असोसिएशन , महाराष्ट्र विभाग जालना जिल्हा प्रेसिडेंट शेख फेरोज सत्तार *

" प्रेस रिलीज "
जालना बाल बलात्कार व हत्याकांडातील दयेच्या अर्जाच्या फेटाळणीचे स्वागत : AIMA मेरठ राज्य उ प महाराष्ट्र विभाग जालना जिल्ह्याचे प्रेसिडेंट शेख फेरोज सत्तार *

AIMA महाराष्ट्र विभाग जिल्हा जालनाचे प्रेसिडेंट शेख फेरोज : यांनी जालना येथे २०१२ मध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी रवी घुमारे याने दाखल केलेला दयेचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे पीडितेच्या कुटुंबाला दीर्घकाळानंतर दिलासा मिळाला असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे माझे संविधानिक विश्वासची साक्ष मत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना AIMA प्रेसिडेंट शेख फेरोज म्हणाले, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दयेचा अर्ज फेटाळणे हा निर्णय मुलांविरोधातील अत्यंत क्रूर गुन्ह्यांबाबत कठोर जबाबदारी निश्चित करण्याच्या तत्त्वाला दुजोरा देणारा आहे.
न्याय मिळण्यास विलंब झाला असला तरी अखेर न्याय प्रस्थापित झाला आहे.”

शेख फेरोज यांनी नमूद केले की सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये या गुन्ह्याचे स्वरूप तपासून मृत्युदंड कायम ठेवला होता आणि हा खटला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ श्रेणीत मोडतो असे स्पष्ट केले होते. या घटनेने समाजाच्या अंतरात्म्याला धक्का दिला असून एका निरपराध बालकाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

शेख फेरोज यांनी पीडितेच्या पालकांशी भावना संविधानिक विश्वासा बद्दल ऐक्य व्यक्त करताना सांगितले की त्यांनी अनेक वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेचा त्रास सहन केला आहे. कायद्याच्या चौकटीत शिक्षा पुढील विलंब न करता अंमलात आणावी, अशी मागणी पीडितेच्या पालकां मार्फत तसेच सर्व जनतेचे मार्फत प्रशासनाकडे करते, असे त्यांनी स्पष्ट केले

24
7857 views