logo

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी

पिंपरी-चिंचवड :१५ दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जयंती उत्सव २०२५ रविवारी, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. “मी यकणार नाही, मी रुकनार नाही, घेतला वसा टाकणार नाही, मी कधी कोणासमोर झुकणार नाही” या प्रेरणादायी विचारांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे चौक, यमुनानगर, निगडी येथे दुपारी ३ वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. मुकाई चौक किवळे, रूपीनगर व साने चौक येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
त्यानंतर मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे व नामफलकाचे पूजन करण्यात आले.

सायंकाळी मान्यवरांचे मनोगत व सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मुंडे साहेबांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करण्यात आला. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सुप्रसिद्ध गायक शिवशाहीर मुरलीधर कुटे (संभाजीनगर) यांच्या लोकसंगीताच्या ‘स्वरमुरली’ कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

जयंती उत्सवाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर तसेच अंध व अपंग बांधवांना अन्नदान वाटप करण्यात आले. लाईफ लाईन रक्तपेढी (सोमाटने) व रेन्बो हॉस्पिटल (कृष्णानगर) यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदात्यांना समितीच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

सायंकाळी ९ ते १० या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. हा संपूर्ण जयंती उत्सव स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जयंती उत्सव समिती, पिंपरी-चिंचवड शहर, दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्रतिष्ठाण, रूपीनगर आणि अनाथांचा नाथ फाउंडेशन, साने चौक यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमामुळे समाजसेवा, आरोग्य जनजागृती व सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

11
542 views