logo

एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत विभागस्तरीय क्रीडास्पर्धेत विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यशचंद्रपूर

आज दि . १७ डिसेंबर २०२५ रोजी एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सन २०२५-२६ विभागस्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजन चंद्रपूर येथे झाले. लोक बिरादरी आश्रमशाळेतील ९२ विद्यार्थ्यांनी मैदानी, खोखो व हॅंडबॉल खेळांत सहभाग घेतला.या स्पर्धेत ७२ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली. मैदानी खेळांत १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी., ३ किमी. धावणे/चालणे, ४×१०० रिले, ४×४०० रिले, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, उंच उडी व लांब उडी प्रकारांत यश. तसेच, १४ व १७ वर्ष वयोगटातील मुली-मुले खोखो, १४ वर्ष मुली-मुले हॅंडबॉल, १७ वर्ष मुले व १९ वर्ष मुली हॅंडबॉल खेळांत उत्कृष्ट कामगिरी.या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा.एकात्मिक आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर

10
211 views