
होप्स इंडिया मुंबई आणि हजरत सैय्यदा आमेना ट्रस्ट यावल यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथे मोफत वैद्यकीय शिबीर संपन्न
जळगांव दिनांक १८/१२/२०२५
(प्रतिनिधी आरिफ खान)
होप्स इंडिया मुंबई आणि हजरत सैय्यदा आमेना ट्रस्ट यावल यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथे दिनांक १४/१२/२०२५ रविवार रोजी मोफत वैद्यकीय शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होप्स इंडिया मुंबई चे अध्यक्ष अल्हाज रेहान अन्वर धोराजिवाला होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शकील सुभानि( मालेगांव) अफजल शेठ, निसार शेठ, फैजान खान, फैसल शेठ, बिस्मिल्ला खान इत्यादी उपस्थित होते. या शिबिरात शुगर, अस्थमा, बी.पी.थायरॉईड ,किडनी आजार, हृदय विकार इत्यादी आजारांची मोफत तपासणी करण्यात आलीआणि एकूण ५६गरीब आणि गरजू रोगींना मोफत औषधे सुद्धा वाटप करण्यात आली.डॉक्टर खिझर (मालेगांव) आणि डॉक्टर जुबेर कुरैशी (नंदुरबार ) यांनी वैद्यकीय तपासणी केली होप्स इंडिया मुंबई या गैरसरकारी संस्थाने आपल्या सहकार्याने खानदेश विभागात एकूण ९ शाखा सुरू केले आहे.या संस्थेचे सहकार्याने मालेगावात एकूण ४० हजार रोगींची मोफत वैद्यकीय तपासणी केलेली आहे .यावल येथे हि हजरत सैय्यदा आमेना वैद्यकीय ट्रस्ट चे स्थापना झालेली आहे.
होप्स इंडिया मुंबई चे अध्यक्ष अल्हाज रेहान अन्वर धोराजिवाला यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगितले की यावल हे खुशहाल आणि सामाजिक कार्यासाठी सुसज्ज आहे लोकांमध्ये गरजू आणि गोरगरीबांना मदत करण्याची भावना आहे .त्यानंतर ते म्हणाले की यावल मध्ये एक मेटर्निटी दवाखान्याचे अति आवश्यकता आहे त्याच्या निर्मितीसाठी यावल येथील दानशूरांनी सहकार्य करावे यात आमची संस्था सुद्धा सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शकील सईद यांनी केले तर आभार प्रदर्शन शकील सुभानि( मालेगांव) यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीते साठी हजरत सैय्यदा आमेना ट्रस्ट यावल चे अध्यक्ष डॉक्टर शकील सईद, उपाध्यक्ष मुसा खान,सचिव शेख शाकीर ,खजिनदार रियाजोद्दीन शेख आणि सदस्य फैजान खान ,अझहर खान,बिस्मिल्ला खान,आणि शेख इब्राहिम यांनी परिश्रम केले.