
सत्य कुटे , कवी नंदी यांच्या अनोख्या
काव्य प्रबोधनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध
सत्य कुटे , कवी नंदी यांच्या अनोख्या
काव्य प्रबोधनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध
चिखली/प्रती.:
स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कनिष्ठ महाविद्यालय द्वारे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर यंदा ग्राम कोलारा येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दि. १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता काव्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रसिद्ध कवी सत्य कुटे, कवी नंदी यांनी आपला सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमादरम्यान चिखली येथील प्रसिद्ध कवी तथा संपादक सत्य कुटे यांनी आपल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा वेध घेणा-या संवेदनशील कविता सादर केल्यानंतर कवी नंदी यांनी अभिनयासह कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कवी नंदी यांची मराठी भाषेचे महत्त्व विषद करणारी आशयघन कविता तसेच सत्य कुटे यांनी सादर केलेली गेय स्वरूपातील कविताही तेवढीच लक्षवेधी ठरली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जगदीश तांबटकर सर, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. लोखंडे सर प्रा निमावत मॅडम तोष्णीवाल मॅडम यांनी आपली उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुनील काकडे (जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना) यांच्यासह सहभागी शिबीरार्थीनी विषेश परिश्रम घेतले.