logo

डोणगाव–शेलगाव पांधण रस्त्यासाठी शैलेश सुबोध सावजी यांचा पाठपुरावा; मुख्यमंत्री बळीराजा योजनेतून उर्वरित तीन किमी रस्त्यास तातडीने मंजुरीची मागणी


डोणगाव प्रतिनिधी सालार बेग

डोणगाव–शेलगाव रस्त्यावरील गणेश शिवाजी इंगळे यांच्या शेतापासून कहऱ्हाळवाडी नाल्याजवळील शाम अशोक खोटे यांच्या शेतापर्यंत सुमारे चार किलोमीटर लांबीचा पांधण रस्ता शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या रस्त्यापैकी एक किलोमीटर रस्त्यास मातोश्री पांधण रस्ते योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. उर्वरित तीन किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री बळीराजा पांधण रस्ते योजनेतून तातडीने मंजूर करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली आहे.
सन २०२१ मध्ये लोकसहभागातून संपूर्ण चार किलोमीटर रस्त्यावर माती भरावाचे काम करण्यात आले होते. त्यानंतर खडीकरणासाठी तलाठी डोणगाव भाग क्रमांक तीन यांनी ६ जुलै २०२२ रोजी तहसील कार्यालय मेहकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव २२ सप्टेंबर २०२२ रोजी तहसील कार्यालयात नोंदविण्यात आला आहे. तसेच ३ ऑक्टोबर २०२३ रोजी दीपक खंडारे व कास्तकार यांनी माननीय मुख्यमंत्री व रोहयो मंत्रालयाच्या अप्पर मुख्य सचिवांकडेही या रस्त्याबाबत निवेदन दिले आहे.
शेतमाल वाहतूक, शेतीकामे व पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेता या रस्त्याला अग्रक्रम देऊन मंजुरी देत तातडीने प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी शैलेश सुबोध सावजी यांनी केली आहे.

30
765 views