logo

*माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी भेट*


मुंबई : माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ. होळी यांनी वनावर आधारित उद्योगांना चालना देणे, वन जमिनीचे पट्टे (अतिक्रमण धारकांना) देण्यात यावे, आदिवासीचें वनावरील हक्क अबाधित ठेवावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाशी निगडित प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्याबाबत सविस्तर निवेदन वनमंत्र्यांना सादर केले. स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेशी संबंधित प्रश्न, विकासकामांतील अडथळे आणि वनहक्काशी निगडित अडचणी याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तसेच गडचिरोली जिल्ह्याला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असा प्रस्तावही डॉ. होळी यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला.
या निवेदनाची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांचे सर्वोत्तम पद्धतीने निवारण करण्याचे आश्वासन दिले. लवकरच गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

14
751 views