logo

पंडितराव धुमाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश..

काँग्रेस पक्षाचे नेते पंडितराव धुमाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व ना अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत मुंबई येथे शिवसेना प्रदेश कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे प्रवेश केला, यावेळी शिवसेना सचिव मा संजय मोरे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेचा धनुष्यबाण असणारा भगवा गमजा घालून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने , उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख रवी गुरमे , उपस्थित होते .
पंडितराव धुमाळ सोबत,निलंगा तालुक्यातील उल्हास सूर्यवंशी, महेश चव्हाण, गहिनीनाथ राजे, बाबुराव आंबेगावे, व्यंकट पन्हाळे ,संतोष पन्हाळे, संजय बिरादार, गजेंद्र पिंपळे यांच्यासह अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून निश्चितच ना एकनाथ शिंदे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली निष्ठेने काम करावे तसेच शिवसेनेसाठी राजकारण कमी करा पण .समाजकारण जास्त करून माननीय एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून शिवसेना मजबूत करावे असे आवहान यावेळी केले. याप्रसंगी पंडितराव धुमाळ यांनी निलंगा, औसा, देवणी या तालुक्यामध्ये निश्चित स्वरूपाने शिवसेनेचा भगवा झंजावात शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली, विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी डिगोळकर यांच्या सोबतीने निश्चितचं निर्माण करू असा विश्वास यावेळी दिला..
* जन जन की आवाज सोशल मीडिया *
( executive reporter विशेष प्रतिनिधी शिवाजी श्रीमंगले )

34
1394 views