
*खोकरल्याच्या 'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन'वर जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई*
*घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड*
*मालकाची उडवा उडवीची उत्तरे*
विलास केजरकर भंडारा*
भंडारा शहरा लगतच्या खात रोडवरील खोकरला येथील'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन' येथे घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले आहे. जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या छाप्यात एकूण ८ सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधितावर भंडारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
त्या धाडीत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, खरेदी अधिकारी सुहास टोंग, पुरवठा निरीक्षण पोचिराम कापडे, पुरवठा निरीक्षक चक्षुपाल भिमटे यांच्या पथकाने सुमनोहर सेलिब्रेशन लॉनमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याने पथकाने अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान लॉनच्या किचनमध्ये सर्व बर्नर एका पाईपद्वारे जोडलेले आढळले. या ठिकाणी एच.पी.सी.एल. कंपनीचे १ भरलेले, १ अर्धवट भरलेले आणि इतर ६ रिकामे, असे एकूण ८ सिलिंडर आढळून आले. त्यावरून अनिल मारोतराव चव्हाण (वय ६८ वर्ष रा. भंडारा) यांच्या विरोधात पुरवठा विभागाने दोन पंचांच्या समक्ष पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. व भंडारा पोलीस स्टेशन येथे अत्यावशक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३, ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नरेश वंजारी जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा .