logo

काँग्रेस स्थापना दिना निमित्ताने कार्यक्रम संपन्न



डोणगाव

ग्रामपंचायत समोर काँग्रेस स्थापना दीवसाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला वरील कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते नाझीम भाई कुरेशी होते त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्ष स्थापना ही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झाली आणि आज संविधान वाचविण्यासाठी देशाला काँग्रेसची गरज आहे काँग्रेस हा विचार असून देशाला एक संघ ठेवणारी एक संघटना आहे देशाच्या प्रगतीमध्ये काँग्रेस पक्षाचा फार मोठा सहभाग आहे महात्मा गांधी यांच्या पुतळ्या ला पुष्पहार घालून काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम ला काँग्रेसचे पदाधिकारी संतोषरावजी नरवाडे वसंतराव बापू देशमुख तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख दिलूभाई शहा शौकत पठाण. रफीक ठेकेदार कार्यक्रमाचे आयोजक विनायक रावजी टाले डोणगाव जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष प्रामुख्याने हजर होते

0
8 views