logo

भंडारा नगरपरिषद भाजप गटनेतेपदी आशु भाऊ गोंडाने यांची निवड

समीर नवाज भंडारा.
भंडारा नगरपरिषद झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व 23 नगरसेवक निवडून आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टी गटाची निवडणूक पार पडली.
ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते ॲड. कैलाश भुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष आशु भाऊ गोंडाने यांची सर्वानुमते भाजप गटनेते म्हणून निवड करण्यात आली.या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मधुराताई मदनकर यांच्यासह नगरसेवक सौ. भाग्यश्रीताई कळंबे, सौ. चंद्रकलाताई भोपे, सौ. कुलप्रीत कवलजितसिंग चड्डा,श्री. भगवान देवराव बावनकर
सौ. रिताताई शैलेश मेश्राम, श्री. शिवशंकर माणिक आजबले, सौ. प्रियाताई शैलेश खरोले,
आशाताई हरिश्चंद्र उईके, श्री. निमिश डोकरीमारे, सौ. वृषालीताई अजय ब्राह्मणकर,
सौ. रूपालीताई रवींद्र नेवारे, श्री. नितीन गायधने, श्री. सचिन घनमारे,सौ. प्रीतीताई अविनाश ब्राह्मणकर, श्री. राजकुमार व्यास,
श्री. आशिष राधेश्याम गोंडाने, सौ. प्रीतीताई ईश्वरीलाल गाढवे, श्री. मंगेश वंजारी, श्री. बल्ली भाई, कु. अल्फिया अमीर शेख,
श्री. हरिश्चंद्र मडावी, श्री. ललितकुमार जांभुळकर,सौ. ज्योतीताई हरीश मोगरे उपस्थित होते.

1
125 views