logo

भैरवनाथ विद्याधाम, लोणी येथे रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

लोणी येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन
लोणी (ता. आंबेगाव) : प्रतिनिधी अमोल पोखरकर
भैरवनाथ विद्याधाम, लोणी येथे रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील नामांकित संघांचा सहभाग अपेक्षित आहे.
स्पर्धेत विजेत्या संघास प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४ हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेसाठी श्री. वसंतशेठ गहिना पडवळ (भैरवनाथ स्टोन क्रशर) यांचे प्रमुख सहकार्य लाभले आहे. तसेच फ्लेक्ससाठी श्री. बाबुशेठ आदक (तन्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स) व श्री. संभाजीशेठ रभाजी पडवळ (आशीर्वाद स्टोन क्रशर) यांचे सहकार्य लाभले आहे.
खेळाडूंना लागणाऱ्या किटसाठी श्री. संजयशेठ दिगंबर पोखरकर (सरपंच, बडगावपीर) व चि. तन्मयदादा बाळ गायकवाड (गावडे ट्रेडर्स) यांनी सहकार्य केले आहे. तसेच पाणी, नाश्ता व इतर सुविधांसाठी स्थानिक युवकांचे योगदान लाभत आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ५०० रुपये असून खेळाडूंनी मूळ आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. स्पर्धा २००८ नंतर जन्मलेल्या व ६० किलो वजनाच्या आतील खेळाडूंसाठी खुली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
संघ नोंदणीची अंतिम तारीख १ जानेवारी २०२६ असून इच्छुक संघांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.
अधिक माहितीसाठी
आदित्य पोखरकर – ९३२२२७१२४७
जितेंद्र विधाटे – ७७०९४२७७०८
राहुल शेख –
९९७५२२८५७६
या क्रमांकांवर संपर्क साधावा.

0
17 views